चार्ली हेब्दो या फ्रेंच नियतकालीत व्यंगचित्र छापल्याने काल अज्ञातांनी जर्मनीतील ‘हॅम्बर्गर मोगेनपोस्ट’ या वृत्तपत्राच्या छापखान्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कोणी जखमी झाले नसले तरी हल्लेखोरांनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याने छापखान्यातील काही महत्वाचे कागदपत्र नष्ट झाल्याचे सांगण्यात आले.गेल्या आठवड्यात फ्रान्समधील चार्ली हेब्दो या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी १२ जणांची हत्या केली होती. या नियतकालिकाने २०११ साली प्रेषित महम्मद पैगंबरांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केले होते. हेच व्यंगचित्र जर्मन वृत्तपत्रानेही छापल्याने नव्याने हल्ला झाला. रात्री झालेल्या या हल्ल्यावेळी सदर ठिकाणी कर्मचारी नसल्याने अनुचित प्रकार घडला नाही. जर्मन पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.