तृणमूल कॉंग्रेस पक्षातर्फे राज्यात टॅक्सी चालक कल्याण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच, टॅक्सी चालकांना एक रक्कमी १० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, अशी माहिती तृणमूलच्या गोवा प्रदेश सहप्रभारी सुस्मिता देव यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितले. तृणमूल कॉँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात टॅक्सी चालकांच्या हितार्थ कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
गोव्यात तृणमूल आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास २५० दिवसांत मीटर बसविण्याचे शुल्क परत दिले जाणार आहे, असेही देव यांनी सांगितले. भाजप सरकारला कोविडनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यास अपयश आले असल्याचा आरोप देव यांनी केला.