तृणमूल कॉंग्रेसचे आमदार अधिकारी यांचा राजीनामा

0
110

पश्चिम बंगालमधील नाराज असलेले तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीला अजून बरेच दिवस असून प. बंगालमध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे.
अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याने पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने स्वागत करत त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.