तृणमूलकडून 42 उमेदवारांची यादी जाहीर

0
9

>> पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?

>> काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

तृणमूल काँग्रेसने काल रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये इिंयाआघाडी संपुष्टात आली असल्याची चिन्हे दिसू लागली असून कंग्रेसचे जयराम रमेश यांनी तृणमूल काँग्रेसच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

तृणमूल काँग्रेसने बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने बशीरहाटमधून अभिनेत्री नुसरत जहाँचे तिकीट रद्द केले आहे. त्याचप्रमाणे शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, अभिषेक बॅनर्जी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसची रॅली घेतली. त्याला जन गर्जन सभा असे नाव देण्यात आले आहे. टीएमसीचे सरचिटणीस आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हेदेखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी, आज मी बंगालच्या 42 लोकसभा जागांसाठी तृणमूलचे 42 उमेदवार पुढे आणणार आहे. ममता विरोधी पक्षांच्या आघाडीचा एक भाग असल्याचे म्हटले.

काँग्रेसकडून नाराजी
तृणमूल काँग्रेसने सर्व जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करताच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने तृणमूल काँग्रेसशी पश्चिम बंगालमध्ये समाधानकार आणि आदरयुक्त जागावाटपाची इच्छा वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. जागावाटपाचे सूत्र हे सविस्तर चर्चेतून ठरवले जावे. कोणतीही एकतर्फी घोषणा नसावी, हीच काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. भाजपविरोधात इंडिया आघाडीने एकत्रितपणे लढा द्यावा असेच काँग्रेसला नेहमी वाटते असे रमेश यांनी यावेळी सांगितले.

इंडिया आघाडी संपुष्टात?
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेसला तृणमूल पक्ष अवघ्या दोन जागा देण्यास तयार होता. तर काँग्रेसला आणखी जागा हव्या होत्या. जागावाटपावर कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. तसेच इंडिया आघाडीशी जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा चालू नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर त्यांनी संयमाची भूमिका घेत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नसल्यामुळे आता शेवटी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या सर्व 42 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.