>> दक्षता खात्याला निर्देश : मुख्यमंत्री
राज्यात नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील तूरडाळ आणि साखर नासाडी प्रकरणात गुंतलेल्या सरकारी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दक्षता खात्याला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
तूरडाळ नासाडी प्रकरणात पाच ते सहा अधिकार्यांवर कारवाई होणार आहे. दक्षता खात्याने यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे. तूरडाळीनंतर साखर नासाडी प्रकरणी फाईल प्राप्त झाली आहे. साखर नासाडी प्रकरणी चौकशी करून त्यात गुंतलेल्या सरकारी अधिकार्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील २४२ मेट्रिक टन तूरडाळ नासाडी प्रकरणी नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांना निलंबित करण्यात आलेले आहे.