राज्यात वीज बिलाच्या एफपीपीसीए शुल्कात वाढ झाल्याने ग्राहकांना वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे.
विजेच्या जुलै ते सप्टेंबरच्या वाढीव दराचा समावेश ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या वीज बिलात केला जाणार आहे. यासंबंधीची एक सूचना वीज खात्याचे मुख्य अभियंता राजीव सामंत यांनी जारी केली आहे.
राज्यातील विजेच्या दरात दर तीन महिन्यांनी चढउतार होत असतो. वीज निर्मितीच्या खर्चावरून वीज बिलाची रक्कम निश्चित केली जाते.
घरगुती वापराच्या वीज बिलाच्या शंभर युनिटपर्यंत ८ पैसे प्रति युनिट वाढ करण्यात आली आहे. २०० युनिटपर्यंत १२ पैसे, ३०० युनिटपर्यंत १७ पैसे आणि ४०० युनिटापर्यंत २० पैसे प्रति युनिट अशी वाढ होणार आहे. औद्योगिक वापराच्या विजेसाठी ५०० युनिटपर्यंत प्रति युनिट २५ पैसे दरवाढ करण्यात आली आहे.