तीन नद्यांतून वाळू उपशासाठी पर्यावरण दाखला महिनाभरात

0
20

मांडवी, झुआरी आणि शापोरा या नद्यांतून वाळू उपशासाठी पर्यावरणीय दाखला मिळवण्यास ज्यांनी खाण खात्याकडे अर्ज केला आहे, त्यांना हा दाखला महिनाभराच्या आत मिळणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. हा दाखला मिळाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने वाळू उपशास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मांडवी, झुआरी व शापोरा ह्या तीन नद्यांतून वाळू उपसा करण्यासंबंधीचा अहवाल राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने सादर केला आहे, तर तेरेखोल नदीसंबंधीच्या त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अन्य राज्यांतून वाळूची वाहतूक करण्यासंबंधीच्या प्रश्नावरही तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. परराज्यातील वाहतूकदारांना वाळू वाहतुकीच्या प्रत्येक खेपेसाठी खाण खात्याकडे 500 रुपये शुल्क भरावे लागणार असल्याचे ते म्हणाले.