तीन दिवसांनंतरही ‘तो’ तरुण बेपत्ताच

0
4

सांतइस्तेव-आखाडा येथील फेरी धक्क्यावरून नदीच्या पात्रात कार बुडाल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता बाशुदेव भंडारी (रा. गुजरात) या तरुणाचा तीन दिवस उलटले तरी थांगपत्ता लागू शकलेला नाही. रविवार 1 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. जुने गोवे पोलिसांकडून मागील दोन दिवसांपासून नदीच्या पात्रात बेपत्ता असलेल्या बाशुदेव याचा शोध घेतला जात आहे. तथापि, अजूनपर्यंत काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही.