>> ९ जणांचा मृत्यू; नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना बळींच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, तिसर्या लाटेतील सर्वाधिक ९ बळींची नोंद झाली. तसेच चोवीस तासांत उच्चांकी नवीन ३३९० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा बर्या होणार्याची संख्या जास्त आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४०.८६ टक्के एवढे आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२ हजार ४६० एवढी झाली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या ३५८५ एवढी झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत नवीन ८२९५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३३९० नमुने बाधित आढळून आले. राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत असून, ९ कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. या ९ पैकी ७ जणांनी कोविड लसीचा डोस घेतला नव्हता, तर दोघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ४ जणांचा, दक्षिण गोवा इस्पितळात एकाचा, तर खासगी इस्पितळात तिघांचा मृत्यू झाला. अन्य एका रुग्णाचा घरीच मृत्यू झाला. एकाचे इस्पितळात दाखल केल्यानंतर ४ तासात, तर दुसर्या एका एकाचे १४ तासांत निधन झाले.
मृतांमध्ये बाणावली येथील ५६ वर्षीय महिला, कळंगुट येथील ६७ वर्षीय पुरुष, चिखली येथील ८५ वर्षीय महिला, असोळणा येथील ५७ वर्षीय महिला, झुवारीनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, काणकोण येथील ७७ वर्षीय महिला, फोंडा येथील ७९ वर्षीय महिला, मडगाव येथील ७३ वर्षीय पुरुष आणि करंजाळे येथील ८१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
राज्यात इस्पितळात दाखल होणार्या कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत ६४ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्या झालेल्या ३० जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
३७२८ जण कोरोनामुक्त
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३७२८ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२९ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या
टक्केवारीत सातत्याने घट होत आहे.