तिसर्‍या दिवशी ८ उमेदवारी अर्ज

0
88

>> भाजपचे मडकईकर, कुंकळ्येकर यांचा समावेश

 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या तिसर्‍या दिवशी एकूण आठ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यात भाजप, आम आदमी पार्टी व एका अपक्ष उमेदवाराचा समावेश होता. भाजपतर्ङ्गे काल पणजी – सिद्धार्थ कुंकळ्येकर, ङ्गातोर्डा – दामू नाईक, थिवी – किरण कांदोळकर, ताळगाव – दत्तप्रसाद नाईक व कुंभारजुवेतून पांडुरंग मडकईकर यांनी उमेदवारी दाखल केली.
आम आदमी पार्टीतर्ङ्गे काल मडगावचे उमेदवार संतोष पै रायतुरकर व शिरोड्याचे उमेदवार मोलू वेळीप यांनी अर्ज भरले. तर वास्को मतदारसंघातून भाजपचे बंडखोर नेते कृष्णा दाजी साळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

आतापर्यंत ११ उमेदवारी अर्ज
काल आठ जणांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आतापर्यंत उमेदवारी अर्ज भरलेल्यांची संख्या ११ एवढी झाली आहे. दरम्यान, आज महिन्याचा दुसरा शनिवार (सेकंड सेटर्डे) असून सुटी असल्यामुळे आज व उद्या रविवार असल्याने दोन दिवस उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.