>> उत्तरेतील बार्देश तालुक्यात एक-दोन दिवसांत पोहोचणार
तिळारी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे प्रमुख काम पूर्ण झाले असून, शनिवारपासून त्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली. परिणामी पुढील एक-दोन दिवसांत बार्देश तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे.
तिळारी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने उत्तर गोव्यातील विशेषत: पर्वरी भागातील पाण्याची समस्या येत्या एक-दोन दिवसांत दूर होण्याची शक्यता आहे. तिळारी धरणातून गोव्याला होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती आणि वार्षिक देखभालीच्या कामांसाठी 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आला होता. हे काम पूर्ण झाले असून शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. ते पाणी 24 तारखेच्या मध्यरात्री किंवा 25 तारखेला सकाळी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिरोडकर
यांनी दिली.