तिरुपती देवस्थानात चेंगराचेंगरी,6 भाविकांचा मृत्यू, 40 जखमी

0
3

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत 40 भाविक जखमी झाले आहेत. काल सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे होते. यावेली भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यास सांगितले गेले तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत झालेल्या भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.