तिबेटमधील भूकंपात 126 लोकांचा मृत्यू

0
3

काल पहाटे नेपाळच्या सीमेजवळ तिबेटमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला, त्यात 126 लोकांचा मृत्यू झाला आणि 180 हून अधिक लोक जखमी झाले. भूकंपाचे केंद्र तिबेटमधील झिझांग हे होते. या भूकंपात तिबेटमधील 1000 हून अधिक घरे कोसळली. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, सकाळी 6.35 वाजता भूकंप झाला.
चीनच्या अधिकाऱ्यांनी 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे सांगितले, तर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे म्हटले आहे. माऊंट एव्हरेस्टच्या उत्तरेस नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने तिबेट, नेपाळ, सिक्कीमच नाही, तर बिहारपर्यंत प्रभाव दिसून आला. बिहारमधील मोतीहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पुर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुजफ्फरपूरमध्ये सकाळी 6.40 वाजता भूकंप जाणवला. माल्दासह उत्तर बंगालमधील काही भागात सकाळी सकाळीच जमीन हादरल्याने अनेक जण घराच्या बाहरे आले. पाच सेकंदापर्यंत जमीन हादरली. जमीन हादरल्याने साखर झोपेत असलेले नागरिक गडबडून घराबाहेर पळाले.