तिजोरी रिकामी झाल्याने पर्रीकर दिल्लीला : शांताराम

0
89

गोवा सरकारची तिजोरी रिकामी झालेली असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे केंद्रीय मंत्री म्हणून नवी दिल्लीला जाऊ पाहत आहेत, असे खासदार शांताराम नाईक म्हणाले. पत्रकारांनी त्याविषयी त्यांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.पर्रीकर यांच्यामुळेच राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला व ४५ हजार कोटींचा महसूल बुडाला. खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना अपयश आले. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, अशी भीतीही त्यांना वाटत आहे. लुईझिन फालेरो हे प्रदेशाध्यक्ष बनल्याने आता राज्यात कॉंग्रेसची ताकद वाढू लागली असल्याचे ते म्हणाले. प्रादेशिक आराखडा अधिसूचित करण्यासही पर्रीकर यांना अपयश आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.