कोरोनाची लस परदेशात चढ्या किमतीत दिली जात आहे; मात्र भारतातील भाजप सरकारसाठी तिजोरी नव्हे, तर देशवासियांचा जीव अनमोल आहे. तिजोरी रिकामी करू, पण लस घरोघरी पोहोचविणार. हे काम आम्ही केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सीतापूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
गरीब माता, बहिणी आणि मुलींना दुःखापासून, उघड्यावर शौचाच्या अपमानापासून मुक्ती हवी आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर माझी गरीब आई अंधाराची वाट पाहत असे. ही माझ्या गरीब आईची व्यथा, गरीब कुटुंबाची व्यथा, गरिबीतून आलेला तिचा मुलगाच जाणू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.