ताळगाव पंचायतीसाठी 22 उमेदवारी अर्ज ग्राह्य

0
10

ताळगाव ग्रामपंचायतीच्या येत्या 28 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. या पंचायतीच्या प्रभाग 10 मध्ये सागर बांदेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर पंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण 24 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. त्यातील 22 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले. प्रभाग 3 मध्ये तीन उमेदवारी अर्ज आणि इतर प्रभागांत प्रत्येक 2 उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. बाबूश मोन्सेरात गट आणि विरोधी गटात लढती होणार आहेत.