मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
ताळगाव मतदारसंघातील 37 किलो मीटर उच्च दाबाची वीज वाहिनी भूमिगत घालण्याचे काम पूर्ण झाले असून 24 किलोमीटर वीज वाहिनी घालण्याचे काम प्रलंबित आहे, अशी माहिती वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या प्रश्नाला उत्तर देताना काल दिली. वीज वाहिनी भूमिगत घालण्याच्या शिल्लक 24 किलो मीटर कामापैकी 3 किलो मीटर कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात कामाचा आदेश जारी केला जाऊ शकतो. तसेच, चार प्रभागांतील वीज वाहिनी भूमिगत घालण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.