ताळगावातील घरफोडीत २ लाखांचा ऐवज चोरीस

0
83

ताळगाव-गलीवाडा येथील जुझे पिंटो यांच्या घराची कौले काढून आत प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप, १० हजार रु. रोख, ३ हजार अमेरिकी डॉलर्स व एक सोन्याची अंगठी मिळून अंदाजे २ लाख रु. चा ऐवज लांबवला.
ही घटना ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दरम्यान घडली. या कालावधीत पिंटो यांचे घर बंद होते. याप्रकरणी पणजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.