तालिबानने अमेरिकेसोबत केलेला शांतता करार पाळणार नसल्याचे जाहीर केले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्येे गेल्या शनिवारीच कतारची राजधानी दोहामध्ये शांतता करार झाला होता. त्या करारानुसार तालिबान हिंसक कारवाया थांबवून शांततेसाठी तरतूद करण्यात आली होती. तर अमेरिकेनेही आपले सैन्य परत बोलावण्याची ग्वाही दिली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान तालिबानसोबतच्या शांतता करारावर समाधान व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी इशारा देताना, कराराची अंमलबजावणी करताना काही गडबड केली तर अफगाणिस्तानमध्ये कोणी कल्पनाही करू शकणार नाही एवढे सैन्य पाठवेल अश ताकीद दिली होती. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी शांतता करारावर समाधान व्यक्त केले होते मात्र त्याअगोदरच तालिबानने हा करार तोडला आहे.