तानावडेंनी राज्यसभेत मांडला एसटी राजकीय आरक्षणाचा मुद्दा

0
14

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत गोव्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) राजकीय आरक्षणाचा मुद्दा मांडला. गोवा राज्य विधानसभेत प्रतिनिधित्व निकंषामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी तानावडे यांनी केली. एसटी समाजाचा आरक्षण हा घटनात्मक अधिकार जपण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत एसटी समाजाचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी हे आरक्षण आवश्यक आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.