तांबडीसुर्ल येथे काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सावित्री मालव नायक (५४) मूळ राहणारी म्हैसूर कर्नाटक हिचा बुडून मृत्यू झाला. ती म्हैसूरहून आपल्या साकवाळ झुवारीनगर येथे नातेवाईकांकडे आली होती. काल सायंकाळी ती सहा जणांच्या गटासोबत सहलीस आली होती. तिने तांबडीसुर्ल येथे देवदर्शन घेतल्यानंतर नदीजवळ गेली असता तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात वाहून गेली. त्यानंतर गावातील लोकांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी ती मृत्यू पावली होती.