तवडकर, कामत यांना आज खाते मिळण्याची शक्यता

0
4

दिगंबर कामत व आपणाला आज खाते मिळणार असल्याच्या वृत्ताला काल नवनियुक्त मंत्री रमेश तवडकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दुजोरा दिला. तर दिगंबर कामत यांनी आज सोमवारी खातेवाटप होण्याची शक्यता असली तरी अद्याप मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत काहीही कळवलेले नाही, असे स्पष्ट केले. पण त्याचबरोबर त्यांनीही आज सोमवारी खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना तवडकर व कामत यांना सोमवारी खाती देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. नवनियुक्त मंत्र्यांच्या शपथग्रहणानंतर अमावास्या आल्याने हे खातेवाटप होऊ शकले नसल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवार हा मडगांवचे ग्रामदेव दामोदर यांचा दिवस असल्याने या शुभदिनीच मंत्र्यांचे खातेवाटप होणार असल्याचे स्पष्ट केले होते. वरील मंत्र्यांना कोणती खाती मिळतात याकडे लक्ष लागून आहे.