तळपण-काणकोण येथे मच्छीमारी बोट बुडाली

0
8

>> 9 जणांना सुखरूप वाचवले

आज सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पारंपरिकरित्या पूजा करून मासेमारीला प्रारंभ करण्याच्या तयारीत असतानाच काल रविवारी 18 रोजी तळपण किना-यावर कोळंब, पाटणे येथील गोवर्धन गोपाल पागी याच्या मालकीची एक मच्छीमारी बोट बुडण्याची घटना घडली. सुदैवाने मनुष्य हानी टळली. मात्र या बोटीत अडीच टन छोटे मासे होते, ते पाण्यात गेल्याची माहिती बोटीचे मालक श्री. पागी यांनी दिली.

समुद्रात अकस्मात आलेल्या भरतीच्या लाटांमुळे बोट हेलखावे खात उलटली. या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाच्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्वाना सुखरूप बाहेर काढले. या बोटीत एकूण 9 जण होते. त्यात कारतीक पागी, प्रकाश पागी, प्रवीण पागी, सुधाकर वेळीप, सुरेश वेळीप, उल्हास वेळीप, संदीप वेळीप, दिलीप पागी यांचा समावेश होता.