…तर विदेशींना मोठ्या संख्येने आणता आले असते

0
103

शवप्रदर्शन प्रकरणी परुळेकरांची खंत
सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शव प्रदर्शनासंबंधी युरोपीय राष्ट्रांच्या दौर्‍यावर जाऊन जाहिरात करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोवा पर्यटन खात्याला विशेष निधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही घटकांनी मंत्र्यांच्या विदेश दौर्‍यांच्या प्रश्‍नावरून सरकारवर टीकेची झोड उठविल्यानंतर सगळेच बारगळले. परिणामी या शव प्रदर्शनासाठी युरोपीय राष्ट्रांतून मोठ्या संख्येने पर्यटकांना आणण्याची संधी पर्यटन खात्याने गमावल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
युरोप दौरा करता आला असता तर पर्यटकांना मोठ्या संख्येने गोव्यात येण्यासाठी आमंत्रण देता आले असते. मात्र, ती संधी हातून गेल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
दरम्यान, शव प्रदर्शनासंबंधीची एकूण तयारी व कार्यक्रम आखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक २६ रोजी १२.३० वा. पर्वरी येथील परिषदगृहात होणार आहे.