व्यवसायासाठी निश्चित केलेले ठिकाण सोडून विमानतळ, रेल्वे स्थानक, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत व्यवसाय करणाऱ्या रेंट अ कॅबचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचा इशारा वाहतूक खात्याने दिला आहे. यासंबंधीची एक नोटीस वाहतूक खात्याचे संचालक प्रवीमल अभिषेक यांनी जारी केली आहे. राज्यात रेंट अ कॅबकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून येत आहे. रेंट अ कॅब व्यवसाय करण्यासाठी ठिकाण निश्चित केलेले आहे. त्याच ठिकाणातून व्यवसाय करण्याची गरज आहे. राज्यातील विमानतळ, रेल्वे स्थानकांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी रेंट अ कॅब चालकांकडून व्यवसाय केला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेंट अ कॅब विरोधात कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.