>> आपचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांच्याकडून स्पष्ट; राज्यात पुन्हा भाजपची राजवट नको
१० मार्च रोजी मतमोजणीनंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आणि सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी भाजपविरोधी आघाडी तयार झाली, तर या आघाडीत सहभागी होण्याबाबत आम आदमी पार्टी (आप) निश्चितपणे विचार करेल, असे पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले.
आम्हाला पुन्हा एकदा राज्यात भ्रष्ट भाजप सरकारची राजवट नको आहे. त्यामुळे राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास आम्ही भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी जी भाजपविरोधी आघाडी पुढे येईल, त्या आघाडीला आम्ही पाठिंबा देणार आहोत, असे म्हांबरे यांनी स्पष्ट केले. आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता नको आहे आणि राज्यात जी भाजपविरोधी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी पुढे येईल, त्या आघाडीला आम आदमी पक्षाने पाठिंबा द्यावा असे मत पक्षाचे प्रमुख या नात्याने त्यांनी यापूर्वीच व्यक्त केलेले आहे, असेही म्हांबरे म्हणाले.
राहुल म्हांबरे यांनी काल पणजीत पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर हे देखील उपस्थित होते.
गोव्यातील जनतेला आता बदल हवा आहे आणि त्यासाठीच लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. गोव्यात जे पुढील सरकार सत्तेवर येईल, त्यात आम आदमी पक्षाच्या आमदारांचा समावेश निश्चितच असेल. नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन आम्ही अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे मॉडेल राज्यात राबवू, असेही म्हांबरे म्हणाले.
यावेळी अमित पालेकर यांनी देखील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेसाठीच्या निवडणुकीत पैशांच्या भरमसाठ वापराबरोबरच गुंडागिरी व दंडेलशाही याचाही मोठ्या प्रमाणात वापर झाला. मात्र, मतदारांनी सत्ताधार्यांच्या पैशांकडे लक्ष न देता आणि गुंडगिरीला न घाबरता मतदान केले, असे ऍड. पालेकर म्हणाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला निश्चितच चांगल्या जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
७-८ जागा मिळणार
‘आप’ला या निवडणुकीत किती जागा मिळतील, असे विचारले असता आम्हाला ७-८ जागा मिळतील, असे राहुल म्हांबरे म्हणाले. कुठ्ठाळी, बाणावली, नावेली, शिरोडा, म्हापसा, दाबोळी, पर्ये या मतदारसंघात ‘आप’चा विजय होईल, असेही ते म्हणाले.ााधार्यांच्या पैशांकडे लक्ष न देता आणि गुंडगिरीला न घाबरता मतदान केले, असे ऍड. पालेकर म्हणाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला निश्चितच चांगल्या जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.