…तर देशातून काँग्रेस संपेल : शहा

0
20

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आसामचा दौरा केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पूर्वी ईशान्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता; पण आता त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ झाला. आता ईशान्येतील काँग्रेस संपले आहे. योग्य वेळी योग्य मार्ग अवलंबला नाही, सुधारणा केली नाही तर देशातून काँग्रेस संपेल, असा घणाघात अमित शहा यांनी केला.
अमित शहा हे दोन दिवसांपासून आसाम-अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले होते.