तमनार वीज प्रकल्पासाठी वृक्षतोड, सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

0
9

तमनार वीज प्रकल्पासाठी गोवा सरकारने सांगोड येथे जी ३ हजार झाडे कापून टाकली त्याविषयी काल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘गोवा फाऊंडेशन’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी गोवा सरकारचे वकील तुषार मेहता हे अन्य एका खटल्याच्या सुनावणीत व्यस्त असल्याने पुढे ढकलावी लागत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाच्या ज्या एक हेक्टर जमिनीत झाडांची घनता ही १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा जमिनीला रुपांतर सनद न देण्याचा जो आदेश न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१५ रोजी दिला होता तो आदेश मागे घेण्यासाठी तमनारने न्यायालयात सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने नोटीस जारी करण्यास काल न्यायालयाने नकार दिला.

आम्ही अवमान याचिकेवरील सुनावणी प्रथम घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे याचिकादार क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्ट केले आहे.