तब्बल 150 मद्यपी चालकांविरुद्ध गुन्हे

0
7

राज्यातील वाहतूक पोलीस विभागाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून, मागील तीन दिवसात रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत 150 वाहनचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जानेवारी 2024 ते आतापर्यंत सुमारे 2318 वाहनचालकांच्या विरोधात मद्यपान प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. गतवर्षी याच काळात केवळ 535 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस वाहतूक विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. 7 ते 9 जून दरम्यान रात्री 8 ते रात्री 11 यावेळेत मद्यपान प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. फोंडा येथे सर्वाधिक 17 वाहनचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. म्हापसा येथे 14, वास्को येथे 13, काणकोण आणि पेडणे येथे प्रत्येकी 12, पणजी, पर्वरी, कळंगुट वाहतूक विभागाने प्रत्येकी 11, मडगाव 10, डिचोली 9, मोपा विमानतळ 7, अंजुणा 6, केपे 5, कोलवा 3 आणि कुडचडेत एका वाहनचालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.