तपास गुन्हा अन्वेषणकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू

0
8

>> बाणस्तारी अपघात प्रकरण

बाणस्तारी येथे भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात प्रकरणाचे तपासकाम म्हार्दोळ पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास आली आहे. दरम्यान, श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि. 21 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे.

गोवा खंडपीठात बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित परेश सावर्डेकर यांचा जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. बाणस्तारी अपघात प्रकरणाचे तपासकाम म्हार्दोळ पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी यावेळी खंडपीठाला दिली.

दरम्यान, बाणस्तारी अपघाताला कारणीभूत मर्सिडीज कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिने म्हार्दोळ पोलिसांच्या समन्सला गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या आव्हान अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मेघना सावर्डेकर हिने फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 23 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.