तनिष्का, प्रीतीचा जामिनासाठी अर्ज

0
5

पोलीस शिपाई प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या महिला पोलीस शिपाई तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांनी काल जामिनासाठी पणजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला नोटीस बजावली असून, या प्रकरणी सुनावणी बुधवार दि. 6 नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने महिला पोलीस तनिष्का आणि प्रीती या दोघांना सोमवारी संध्याकाळी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी प्रथमेश गावडे याने झुआरी पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. प्रथमेशने झुआरी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी स्वत: रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात या दोन महिला पोलीस शिपाई आपला छळ करीत असल्याचा आरोप त्याने केला होता.