तडीपारीच्या नोटीस प्रकरणी डिझोझा दांपत्याला दिलासा नाही

0
15

तडीपारीच्या नोटीस प्रकरणी शिवोली येथील फाइव्ह पिलर चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जोन मास्कारेन्हास यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तूर्त नकार दिला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तडीपार प्रकरणी बजावलेल्या नोटीसला आव्हान देणारी त्यांची याचिका बाजूला ठेवली आहे. त्यामुळे डॉम्निक आणि त्याच्या पत्नीने आपली आव्हान याचिका मागे घेतली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून तडीपारीचा आदेश प्रत्यक्षात मंजूर झाल्यास त्यांना पुन्हा संपर्क साधण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारीला होईल.