तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू

0
4

गुजरातमधील पोरबंदर येथे काल रविवारी दुपारी 12 वाजता भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तटरक्षक दलाचे सदर हेलिकॉप्टर ध्रुव नियमित उड्डाण करत होते. पोरबंदर हवाई पट्टीवर उतरताना हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर पडताच त्याला आग लागली. भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलटसह 3 लोक होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (ध्रुव) पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात पडले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधील चार क्रू मेंबर्सपैकी एक जण बचावला, तर तीन क्रू मेंबर्स बेपत्ता झाले.