तक्रारींसाठी खास नियंत्रण कक्ष स्थापन

0
11

येथील आयकर विभागाने लोकसभा निवडणूक 2024 मधील पैसे वाटप किंवा मोफत वस्तू वाटपाबाबतच्या तक्रारींसाठी खास नियंत्रण कक्ष पाटो-पणजी येथे कार्यान्वित केला आहे.

हा नियंत्रण कक्ष नागरिकांच्या तक्रारींसाठी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 24 तास खुला राहणार आहे. व्यक्ती किंवा राजकीय पक्षांकडून रोख, मोफत वस्तू किंवा कोणत्याही प्रलोभनाच्या वितरणाबाबत तक्रार स्वीकारली जाणार आहे. नागरिक आपली तक्रार फोन नंबरवर संपर्क साधून किंवा ई-मेलद्वारे विभागाला देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे आणि तपशील गोपनीय ठेवण्यात येतील, असे आयकर खात्याने जारी केलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक : 1800-233-3941, दूरध्वनी क्रमांक : 0832-2438447 आणि ई-मेल : सेरशश्रशलींळेपीऽळपलेाशींरु.र्सेीं.ळप द्वारे तक्रारी केल्या जाऊ शकतात.