ढवळी-फोंडा येथे गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्याच्या संरक्षण भिंतीला जीपची धडक बसली. त्यात चालकाचा मृत्यू झाला. अशोक इरगप्पा (50, रा. जुने गोवे) असे मृत चालकाचे नाव आहे. गंभीर अवस्थेतील जीपचालकाला इस्पितळात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, जीए-07-टी -1143 क्रमांकाची जीप ढवळी येथील जंक्शनवर पोहचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीपची धडक नाल्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला बसली. गंभीर अवस्थेतील चालकाला 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले; पण तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, जीप चालवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.