गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने आंतरराज्य गांजा पुरवठा नेटवर्कचा प्रमुख गुड्डू मोची राम याला पलामू-झारखंड येथे अटक करून त्याला गोव्यात आणले. एएनसीने काही दिवसांपूर्वी अस्नोडा येथे छापा घालून झारखंडमधील 2 तरुण आणि गोव्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 13 किलो गांजा हस्तगत केला होता. त्या तिघांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या गुड्डू मोची राम याला झारखंड पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेण्यात यश आले. न्यायालयाने गुड्डू मोची राम याची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.