ड्रग्ज तस्करी प्रकरणी चार पोलीस निलंबित

0
0

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील अमलीपदार्थ (ड्रग्ज) तस्करी प्रकरणामध्ये तुरुंग प्रशासनाने चार जणांना काल निलंबित केले. निलंबित केलेल्यांमध्ये जेलर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि शिपायाचा समावेश आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये अमलीपदार्थांच्या तस्करीचे प्रकार वरच्या वर घडत आहेत. कैद्यांना अमलीपदार्थांचा पुरवठा तस्करीच्या माध्यमातून केला जातो. तसेच, कारागृहातील कैद्यांच्या कक्षात मोबाईल फोन सुध्दा आढळून आलेले आहेत. मध्यवर्ती कारागृहातील अमलीपदार्थांच्या तस्करी प्रकरणाबाबत आयआरबी पोलिसांनी एक अहवाल तुरुंग प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे जेलर कृष्णा उसगावकर, आयआरबीचा साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरस्कर, एक हवालदार आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.