>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय
अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज एनसीबीद्वारे शनिवारी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी गुरूवारी गोव्याहून पती रणवीरसिंहसोबत गोव्यातून मुंबईला दीपिका रवाना झाली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती गोव्यात आली होती.
गुरूवारी गोव्यातून सारा अली खान ही अभिनेत्रीही मुंबईला रवाना झाली. एनसीबीने तिलाही समन्स बजावले होते. गुरूवारी ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून दीपिका, सारा अली खान यांच्यासह, श्रद्धा कपूर आणि रकूलप्रीत सिंह यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
रकुलप्रीत सिंहचा दावा
अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने चौकशीदरम्यान रियासोबत ड्रग्जसंबंधी चर्चा झाल्याचे तसेच घरात ड्रग्ज होते पण त्याचे सेवन केले नसल्याचे सांगितले. पण हे ड्रग्ज रियासाठी होते असा दावा तिने केला. रकुलप्रीत ही काल शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली होती. त्यानंतर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही पोहोचली होती.
सुशातच्या आत्महत्याप्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेनंतर एनसीबीद्वारे चौकशी सुरू होती. या चौकशीत दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर आणि करिश्मा ही नावे समोर आली. व्हॉट्स ऍप चॅटमध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.
दीपिका ऍडमिन?
याआधी एनसीबीकडून ड्रग्ज चॅटच्या व्हॉट्सऍप ग्रुपची ऍडमिन असल्याचा खुलासा कऱण्यात आला होता. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि जय साहा या ग्रुपमध्ये होते. हा व्हॉट्सऍप ग्रूप २०१७ मध्ये तयार करणात आला होता. करिश्माची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. तर दीपिकाची आज चौकशी होणार आहे.
करण जोहरचीही चौकशी होणार?
अमली पदार्थप्रकरणी एनसीबी बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय आहे. करण जोहरच्या या पार्टीत दीपिका, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, झोया अख्तर, शाहीद कपूर, मलायका अरोरा यांच्यासहित अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. पार्टीत हजेरी लावलेल्या सर्व सेलिब्रेटींना एनसीबीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.