डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

0
218

अमेरिकी संसद भवनात झालेल्या हिंसाचारप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. महाभियोग चालवण्यासाठी २१८ मतांची गरज होती. यावेळी सदनाच्या २१५ पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि पाच रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिल्याने आता ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर डेमोक्रेटिक नेत्यांच्या नियंत्रणाखालील अमेरिकन प्रतिनिधी सभेने बुधवारी मतदान केले आहे. या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील दोनवेळा महाभियोग चालणारे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. महाभियोग प्रस्तावात ट्रम्प यांच्यावर ६ जामेवारी रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी राजद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.