डोंगरी-नावेलीत पत्नीचा पतीकडून खून?

0
102

डोंगरी-नावेली येथे वृध्द पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर पत्नी चंद्रकला मेहता (६२) हिचा मृतदेह इमारतीच्या खाली सापडला. मडगाव पोलिसांनी खून म्हणून गुन्हा नोंद केला असून पती मोहन मेहता (७१) हा फरारी आहे.
मोहन व चंद्रकला मेहता हे दांपत्य डोंगरी-नावेली येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असत. वारंवार पती-पत्नीमध्ये खटके उडत. काल गुरुवारी सकाळी उभयतांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात पतीने टी. व्ही. संच फोडला, फोन तोडला, कपाट फोडले त्यानंतर पत्नीने खिडकीतून खाली उडी मारली त्यात ती ठार झाली. मात्र तिने उडी मारली की पतीने ढकलले हे अजून स्पष्ट झाले नाही. पोलीस निरीक्षक सी. एल्. पाटील तपास करीत आहेत.