नगरनियोजन खात्याने मागील 6 महिन्यांत डोंगर कापणीसाठी एकही परवाना दिलेला नाही. मागील अडीच वर्षांत 900 ते 950 डोंगर कापणीबाबत तक्रारी दाखल करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजीत यांनी काल दिली. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राणे यांची भेट घेऊन मतदारसंघातील बेकायदेशीर झोन बदलाबाबत तक्रार करून त्यांना मान्यता देऊ नये अशी मागणी केली. नगरनियोजन विभाग कुडतरी येथील डोंगरकापणीच्या संबंधित एकाही अर्जावर प्रक्रिया करणार नाही. डोंगराळ भागाच्या विकासाला परवानगी दिली जाणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.