टू जी घोटाळा प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व पंतप्रधानांच्या कार्यालयाला कोणत्याही पुराव्याविना ओढल्याबद्दल सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सीबीआय तपास यंत्रणेवर कडक ताशेर ओढले आहेत. आपले आरोप सिध्द करण्यासाठी सीबीआय तपास यंत्रणेने तत्कालीन पंतप्रधान किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणालाही न्यायालयासमोर उभे केले नाही असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
टू जी स्पेक्टमचे परवाने देताना दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी मनमोहन सिंग यांची दिशाभूल केली याविषयी तपास यंत्रणेला कोणतेही पुरावे देता आले नाही. केवळ पूर्वग्रह व अंदाज यावर तपास यंत्रणेचा भर होता असे न्यायालयाने म्हटले आहे.