डीविलियर्स पहिल्या तीन वन-डेतून बाहेर

0
99

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज अब्राहम डीविलियर्स जखमी झाल्याने भारताविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डेत खेळू शकणार नाही. जोहान्सबर्ग येथे तिसर्‍या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात झेल पकडताना डिविलिर्यसच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळेच डिविलियर्सने डर्बन, प्रिटोरिया आणि केपटाऊन वनडेतून माघार घेतली असून असून याबाबत आज अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघाला मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला उद्या १ रोजीपासून सुरुवात होणार .