दहशतवाद्यांना मदत करीत असल्याच्या आरोपावरून अलिकडेच अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) दविंदर सिंग याला या आधी देण्यात आलेले शेर-ए-काश्मीर शौर्य पदक जम्मू-काश्मीर प्रशासनाने काढून घेतले आहे. या बाबतचा आदेश प्रदेशाचे प्रधान गृह सचिव काब्रा यांनी काल जारी केला.
वरील आरोपामुळे अटक झाल्यानंतर सेवेतून निलंबित केलेल्या दविंदर सिंग याच्याकडून पोलीस खात्याला डाग लागल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे. सरकारी आदेशानुसार दविंदर सिंग याला जम्मू-काश्मीर पोलिसांना देण्यात येणारा सर्वोच्च सर्वोच्च असा पुरस्कार २०१८ साली देण्यात आला होता. दविंदर सिंग याला काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी व दहशतवाद्यांसाठी काम करणार्या एका वकिलाला गाडीतून घेऊन जाताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडील काही शस्त्रे व दारूगोळाही जप्त करण्यात आला होता.