राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डीएसएसवाय) लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याला आधारकार्ड तीन महिन्यांत जोडण्याची सूचना केली आहे. बँक खात्याला आधारकार्ड न जोडणाऱ्या लाभार्थ्यांचे मानधन स्थगित ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
डीएसएसएस योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर मानधनाचे वितरण करण्यासाठी ‘आधार’ आधारित पेमेंट व्यवस्थेचा अवलंब केला जाणार आहे.
या योजनेखाली ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग आदींना मासिक मानधन दिले जाते. बँक खात्याला आधारकार्ड जोडलेले नसल्यास मानधन वितरणामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांत आपल्या बँक खात्याला आधारकार्ड जोडावे. आधारकार्ड न जोडणाऱ्या लाभार्थ्यांचे मानधन स्थगित ठेवले जाणार आहे, असे समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात
म्हटले आहे.