डिसेंबरपासून दोनापावल जेटी पर्यटक, जनतेसाठी खुली होणार

0
10

डिसेंबरपासून पर्यटक आणि जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली.

दोनापावल येथील जेटी ही नूतनीकरणाच्या कामामुळे नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या दोनापावल जेटीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत एक बैठक येथील पर्यटन भवनात घेण्यात आली.

या बैठकीला महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात व इतरांची उपस्थिती होती. या बैठकीत दोनापावल जेटीवरील कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच, तेथील विक्रेत्यांच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
दोनापावल जेटी १ डिसेंबर पासून जनतेसाठी खुली करण्याचे आश्‍वासन रोहन खंवटे यांनी बैठकीत दिले आहे. तसेच तेथील व्यावसायिकांच्या प्रश्‍नावर योग्य तोडगा काढला जाणार आहे.