डबल इंजिन सरकारकडून गुन्हेगारांना आश्रय

0
12

>> काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अल्का लांबा यांची टीका

देशात महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. जिथे डबल इंजिनची सरकारे आहेत, तिथे महिला सुरक्षित नाहीत. डबल इंजिन सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना आश्रय देत आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक छळात गुंतलेला असून, एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळाला आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अल्का लांबा यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

भारताच्या संविधानात बदल करण्याचे भाजपचे कारस्थान रचले आहे. भाजप भारतीय संविधानाच्या जागी आरएसएसची घटना आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्
य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर आणि एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा उपस्थित होते.