‘ठेकेदारांकडे सत्ता सोपवू नका’

0
104

झारखंडमध्ये भाजपला निवडून आणा : मोदी
झारखंडमधील युती पक्षांना मत देऊन तेथे ‘ठेकेदारांकडे’ सत्ता सोपवू नका. त्याऐवजी मजबूत व स्थिर सरकारसाठी भारतीय जनता पक्षाला जनादेश द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना केले.विरोधकांकडील सर्व मुद्दे संपले असल्याने ते आता कारण नसताना आपल्या सरकारला लक्ष्य करीत असल्याबद्दल मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ‘झारखंडला स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही चूक करू नका व भाजपचे राज्यात सरकार निवडून आणा. जर तुम्ही बहुमताचे सरकार निवडून आणले तर सत्ता लोकांच्या हाती येईल. मात्र आघाडी सरकारकडे सूत्रे दिल्यास सत्ता ठेकेदारांकडे जाईल’, असे उद्गार त्यांनी काढले.
झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १४ रोजी धनबाद मतदारसंघात होणार आहे. केंद्रात तुम्ही भाजपला सत्ता दिली. आता तुमच्या राज्यात तुम्ही तसेच करणार नाही काय असा सवाल त्यांनी केला. विरोधकांकडे सरकार विरोधात कोणतेही मुद्दे नसल्याने ते लोकसभा निवडणुकीवेळी केलेली भाषणेच ते आताही करत आहेत अशी टीका त्यांनी केली.
आपल्या सरकारने राबविलेल्या जनधन योजनेचा लाभ गरीब लोकांना झाल्याचा दावा मोदी यांनी केला. या योजनेद्वारे लोकांनी सात हजार कोटी रु. च्या ठेवी बँकांमध्ये जमा केल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.