ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात; तर शिंदे गट उच्च न्यायालयात

0
24

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवले; परंतु खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मान्यता दिली. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होत आहे, तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही? असा सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.