ठकसेन दीपाश्री, प्रिया पोलिसांच्या जाळ्यात

0
1

>> नोकरीच्या आमिषाने अनेकांकडून उकळले लाखो रुपये; दीपाश्रीचा साथीदार सागर नाईकला अन्य एका प्रकरणात पुन्हा अटक

माशेल भागातील एका हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी उसगावातील महिलेकडून 15 लाख रुपये उकळल्या प्रकरणी दीपाश्री सावंत गावस हिला काल अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर दीपाश्री ही फरार झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती. याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंत्याची नोकरी देण्यासाठी 10 लाख रुपये उकळल्याप्रकरणी सागर नाईक याला काल पुन्हा अटक करण्यात आली. त्या प्रकरणातही दीपाश्रीचा हात आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे आणि इतर ठिकाणी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या प्रिया यादव नामक महिलेला डिचोली पोलिसांनी कोल्हापुरातून ताब्यात घेत, नंतर गोव्यात आणून तिला अटक केली. नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, नवनवी प्रकरणे समोर आहेत.

उसगाव भागातील एका महिलेने शिक्षिकेच्या नोकरीसाठी सागर नाईक याला 15 लाख रुपये दिले होते. सदर रक्कम सागर नाईकने आपली मामी तथा मुख्याध्यापिका सुनीता पाऊसकर व मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत गावस हिच्याकडे दिली होती.

नोकरी मिळाली नसल्याने अखेर उसगाव येथील सदर महिलेने सागर नाईक याच्याविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून 27 ऑक्टोबरला सागर नाईकला अटक केली. त्यानंतर 28 ऑक्टोबरला सुनीता पाऊसकर यांना अटक केली होती. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी दीपाश्री ही गेल्या काही दिवसांपासून फरार होती. त्यामुळे फोंडा पोलिसांनी तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती.

मोले तपासणी नाक्यावरून दीपाश्रीला घेतले ताब्यात

दीपाश्री सावंत ही बेळगाव परिसरात लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिला ताब्यात घेण्यासाठी दोन वेळा पोलीस पथक बेळगावमध्ये रवाना झाले होते; पण ती पोलिसांना सापडली नव्हती. सोमवारी सकाळी बेळगावहून दीपाश्री सावंत गोव्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा लावून मोले तपासणी नाक्यावरून गोव्यात प्रवेश केल्यानंतर दीपाश्रीला ताब्यात घेऊन अटक केली. निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दीपाश्रीची अनेक आडनावे

फोंडा पोलिसांनी अटक केलेली दीपाश्री सावंत ही दीपाश्री गावस व दीपाश्री मोहतो या नावाने सुद्धा ओळखली जात आहे. शिक्षिकेच्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणात पोलीस कर्मचारी सागर नाईक व मुख्याध्यपिका सुनीता पाऊसकर यांना यापूर्वी फोंडा पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेली दीपाश्री सावंत ही या प्रकरणात मुख्य सूत्रधार असून, तिच्याकडून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

प्रिया यादवने 20 लाख उकळले; अन्‌‍ 116 ग्रॅम सोनेही गहाण ठेवले

रेल्वे खात्यात व इतर ठिकाणी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून डिचोलीतील, तसेच राज्याच्या विविध भागांतील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या प्रिया यादव या महिलेला अखेर डिचोली पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला गोव्यात आणून रितसर अटक केली. सोमवारी दुपारी प्रिया हिला न्यायालयात हजर केले असता तिला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. प्रिया यादवने रेल्वेत नोकरीच्या आमिषाने एकाकडून जवळपास 20 लाख 70 हजार रुपये रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. याशिवाय पीडित लोकांकडून 116 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ते तारण ठेवत कर्जही घेतले. हे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. त्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार 9 लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, काल प्रियाविरुद्ध डिचोली पोलिसांत अनेक तक्रारी नोंद झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 1 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

प्रिया यादवच्या विरोधात गेल्या ऑगस्ट महिन्यात बोर्डेतील अनिकेत दलवाई यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्याच काळात सदर महिला डिचोलीतून गायब झाली होती. या प्रकरणात सहभागी असलेला पोलीस शिपाई रोहन वेंजी याची चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते; परंतु प्रिया ही पोलिसांच्या हाती लागली नव्हती. प्रिया हिने आपल्या कोल्हापूर येथील 2 जागा रेल्वे रुळासाठी जाणार असल्याचे सांगून त्या मोबदल्यात तिला पाच नोकऱ्या रेल्वेत मिळणार असल्याचा दावा केला. प्रत्येक पदासाठी दहा लाख रुपयांची मागणी तिने पीडितांकडे केली. याशिवाय नोकरीच्या बहाण्याने तिने अनेकांकडून लाखो रुपये लाटले असून, काल अनेकांनी डिचोली पोलीस ठाण्यात प्रिया व रोहन वेंजी याच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी नोंदवल्या.

ठकसेन दीपाश्री, प्रिया पोलिसांच्या जाळ्यात

नोकरीच्या आमिषाने अनेकांकडून उकळले लाखो रुपये; दीपाश्रीचा साथीदार सागर नाईकला अन्य एका प्रकरणात पुन्हा अटक

सागरने आणखी एकाकडून 10 लाख उकळले

सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंत्याची नोकरी देण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा सागर नाईक या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध फोंडा पोलिसांनी नोंदवला असून, त्याला काल अटक करण्यात आली. कनिष्ठ अभियंत्याची नोकरी देण्यासाठी सागर नाईकने सावर्डे येथील एका व्यक्तीकडून 10 लाख रुपये घेतले होते; पण नोकरी मिळाली नसल्याने रक्कम परत करण्यासाठी सदर व्यक्तीने सागर नाईककडे तगादा लावला; मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे सागर नाईकविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

प्रकाश राणे याला 3 दिवस पोलीस कोठडी
पणजी (प्रतिनिधी) : पणजी पोलिसांनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या निवृत्त सरकारी कर्मचारी प्रकाश राणे याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका युवकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्याच्याविरुद्ध नोंद आहे.

पीडित लोकांनी तक्रारी नोंदवाव्या : मुख्यमंत्री
पणजी (न. प्र.) सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन ज्या लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या लोकांना पुढे येऊन आरोपींविरुध्द तक्रार करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. या प्रकरणी गृह खात्याने कारवाई करण्याचे काम सुरू केले असून, या घोटाळ्यातील एकाही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पीडित लोक आता पुढे येऊन तक्रार नोंदवायला घाबरू लागले असून, त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.